राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चा आठवा युनिफॉर्म 2024 फेअर बेंगलोर मध्ये
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सात युनिफॉर्म गारमेंट फेअर यशस्वीरित्या राबविल्यानंतर आता पुन्हा सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन च्या आठव्या फेअरचे आयोजन बेंगलोर येथे केले असून *याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तसेच सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे फेअर चेअरमन सुनील मेंगजी यांनी सांगितले.*
हा युनिफॉर्म गारमेंट फेअर 18 19 20 डिसेंबर 2024 ला बेंगलोर येथील शृंगार पॅलेस गार्डन पॅलेस ग्राउंड आठ नंबर गेटवर संपन्न होणार आहे अशी घोषणा असोशियन ने केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
या फेअर च्या माध्यमातून युनिफॉर्म सोर्सिंग प्लॅटफॉर्म फक्त सोलापूरच आहे किंवा वैश्विक संदेश देत असताना सोलापुरात फक्त युनिफॉर्म गारमेंट यशस्वीरित्या बनवू शकतो असा उद्देश असून ही माहिती यशस्वीरित्या सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या युनिफॉर्म फेअर मध्ये एकाच छता खाली बाराशे ब्रँड व दहा हजार युनिफॉर्म डिझाइन्स पाहायला मिळतील याचा अर्थ शाळा कॉलेज हॉस्पिटल्स रेल्वे आणि कार्पोरेट सेक्टर ना ही एक युनिफॉर्म चे मेजवानीच ठरेल याबाबत कोणतीही शंका नाही.
सोलापूर जिल्ह्यात सक्षम आणि यशस्वीरित्या युनिफॉर्म गारमेंट कारखाने चालविणारे उद्योजक आहेत. विशेष आणि दर्जेदार मशिनरी द्वारा व कुशल कारागीर द्वारा या युनिफॉर्म गारमेंट चे उत्पादन होते.
देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव युनिफॉर्म सोर्सिंग हब बनण्याच्या उद्देशाने सोलापूर आपले लक्ष निर्धारित करीत असल्याचे सुनील मेंगजी यांनी सांगितले आहे कारण उत्कृष्ट डिझाइन्स चांगले दर्जेदार कापड व कुशल कामगारांच्या हस्ते ही युनिफॉर्म बनविले जाते आणि ती कमीत कमी खर्चात उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष युनिफॉर्म गारमेंट करिता सोलापूरकडे लागले असल्याचे त्यांनी सांगितले.
*18, 19, 20 डिसेंबर 2024 या तीन दिवसात शृंगार पॅलेस ग्राउंड जया महल गेट नंबर आठ* येथे संपन्न होणाऱ्या प्रदर्शनास बेंगलोर शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, उद्योजक आणि कार्पोरेट क्षेत्रातील ग्राहकांनी आवर्जून उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
*राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या युनिफॉर्म प्रदर्शनाचे नाव झालेले आहे कारण इकडे कमीत कमी दरात दर्जेदार कापड घेऊन युनिफॉर्म बनविले जाते जास्त करून स्कूल युनिफॉर्म, कॉलेज युनिफॉर्म, हॉस्पिटल युनिफॉर्म, कार्पोरेट युनिफॉर्म, रेल्वे युनिफॉर्म, असे विविध नामवंत संस्थांची कामे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरचे उद्योजक केलेले आहेत.*
आता पर्यंत संपन्न झालेल्या प्रदर्शनाला केनिया, जॉर्डन श्रीलंका थायलंड अशा विविध देशातील उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन युनिफॉर्म चे काम करून घेतलेले आहेत. अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी बेंगलोर करांनी आवश्यक यावे असे आवाहन असोशियनच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Comments