Hot Posts

6/recent/ticker-posts

थेऊर आरोग्य उपकेंद्र मार्फत हत्तीरोग दूर करण्या साठी सर्वेक्षण

 थेऊर आरोग्य उपकेंद्र मार्फत हत्तीरोग दूर करण्या साठी सर्वेक्षण




थेऊर (कटूसत्य वृत्त):- थेऊर गाव परिसरातील तसेच वाड्या वस्त्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीर वाडी अंतर्गत थेऊर आरोग्य केंद्रामार्फत हत्तीरोग सर्वेक्षण मोहीम दिनांक 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत रक्त नमुने संकलित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे , या मोहिमेत 20 वयापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांची रक्त संकलनाचे नमुने गोळा करण्यात येणार असून दैनंदिन 50 नागरिकांचे रक्त नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत 
 हत्तीरोग हा क्युलेक्स डासांपासून होणारा संक्रमण आजार असून,हा आजार ( फायलेरिय ) या नावाने ओळखला जातो , फायलेरिय डासांची उत्पत्ती गटारे , सांडपाणी , घाण पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते.
दूषित डासांची मादी मनुष्याला चावते व त्वचेवर हत्तीरोगाचे जंतू सोडतो हे जंतू त्वचेतून मानवी शरीरात प्रवेश करतात व लसिका ग्रंथी मध्ये स्थिरावतात. जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा दहा ते बारा वर्षे  असतो.सदर कालावधीत रक्ताची तपासणी केली नाही व औषधोपचार केला नाही तर शरीरात जंतूंची वाढ होऊन हाता पायावर सूज येणे व अंड वृद्धी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
 
आरोग्य कार्यालयाचे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे , मा.जि हिवताप अधिकारी पुणे , यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे , डॉ. रूपाली भंगाळे ,यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.  तसेच हत्ती रोगाविषयी नागरिकांना आरोग्य माहिती देऊन जनजागृती करून रक्त नमुने संकलित करीत आहेत अशी माहिती थेऊर उपकेंद्राचे डॉ. शिल्पा दलाल यांनी दिली. या मोहिमेत आरोग्य सहाय्यक श्री बाळासाहेब मारणे , हिवताप कार्यालयाचे श्री डी.डी. कुंभार , एम. बी. पाटोळे , थेऊर आरोग्य केंद्राचे डॉ.शिल्पा दलाल , आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार ,सुनील वाघमारे , बाळू चोपडे , आरोग्य सेविका सुषमा काळभोर , आशाताई पुष्पा गायकवाड , निर्मला कांबळे , रूपाली गाडे , दिपाली सावंत , ज्योती टोम्पे इत्यादी सहभागी झाले.


Reactions

Post a Comment

0 Comments