Hot Posts

6/recent/ticker-posts

महान गायक मोहम्मद रफी यांना 100 व्या जयंतीनिमित्त फक्त हौशी कलाकाराकडून आदरांजली

 महान गायक मोहम्मद रफी यांना 100 व्या जयंतीनिमित्त फक्त हौशी कलाकाराकडून आदरांजली




बार्शी (कटूसत्य वृत्त):- मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या 100 व्या  जयंती निमित्त फक्त हौशी कलाकार यांनी गीतामधून आदरांजली देण्यात आली अचानक कार्यक्रम ठरवून सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सदर कार्यक्रम हा हौशी कलाकार सदस्य गोविंद तापडिया यांच्या घोडे गल्ली,बार्शी या दुकानी पार पडला यावेळी मेजर हिंगमिरे ,सीए बालकिसन जाजू अजय खंडेलवाल, रवींद्र मैंदर्गीकर, राहुल झोंबाडे ,गोविंद तापडिया आणि सुनील फल्ले यांनी गीते सादर करून कार्यक्रम भारदस्तपणे सादर केला यामध्ये CA बालकीसन जाजू यांनी पत्थर के सनम ,दोनो ने किया प्यार मगर आणि तारीफ करू क्या उसकी अशी गीते सादर केली तसेच हिंगमिरे मेजर यांनी गुजरे है इश्क मे हम, तू मेरे सपणो की राणी बनेगी,गीते सादर केली रवींद्र मैंदर्गीकर यांनी मुझे इश्क है तुम्ही से कहा चल दिये अशी गीते सादर केली राहुल झोंबाडे यांनी छू लेने दो नाजूक होठो को  आणि पत्ता पत्ता बुटा बुटा अशी गीते  सादर असे गीते सादर केली अजय खंडेलवाल यांनी मै कही कवी न बन जाऊ,पुकारता हू ,आपके हसीन अशी गीते सादर केली गोविंद तापडिया यांनी आज मौसम बडा, बडी मस्तानी है अशी गीते सादर केली सुनील फल्ले यांनी जॉन जानी जनार्दन ,ओ मेरी मेहबूबा, आणि नाम अब्दुल्ला है मेरा अशी गीते सादर केली सर्वांनी अप्रतिम गीते सादर केली कार्यक्रमासाठी गोविंद तापडिया यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मेजर हिंगमिरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल झोंबाडे आणि सुनील फल्ले यांनी नियोजन केले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments