उत्तरमध्ये भाजप कडून रडीचा डाव ; महेश कोठे यांनी घेतले फैलावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे या दोघांमध्ये लढत होत आहे. या निवडणुकीत कोठे आडनावाचा एक दुसरा उमेदवार या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत आहे. यावरून महेश कोठे यांनी विजय देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली.
भाजप रडीचा डाव खेळत आहे, आतापासूनच त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे या प्रकरणावरून दिसते. त्यामुळे लोक खोट्याला थारा देणार नाहीत, कोठेच्या सोबत राहतील
0 Comments