देशामधील पहिल्या ब्रीज कम बॅरेजची दक्षिण सोलापूर मतदारसंघात उभारणी- सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सीना नदीतील केटीवेअरमधून पाण्याची गळती होऊन नदीत पाणीसाठा राहत नाही हे लक्षात घेऊन देशातील पहिला ब्रीज कम बॅरेज बांधून नदीत बारमाही पाण्याचा प्रयत्न केला. उत्तर सोलापूर तालुक्यात तिन्हे व दक्षिण सोलापूरमध्ये विजयपूर महामार्गावर वडकबाळ येथे बॅरेज बांधण्याचे काम सुरू केले. त्यामुळे मतदारसंघात जलकांती होणार असल्याचे प्रतिपादन दक्षिण सोलापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी केले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुभाष देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तिन्हे येथे सीना नदीवर लांबी ९० मीटर तर उंची ४.५० मीटरमध्ये १० गाळे आहेत. त्यामुळे नदीत ७६.७६ दशलक्ष घनमीटर पाणी साठणार असून महामार्गावर होणारा हा देशातील पहिला ब्रीज कम बॅरेज. शिंगोली, तरटगाव, तिन्हे आदी गावांसह ३५७ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. वडकबाळ येथे ७० मी. लांब व ३.५० मी. उंचीचा बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. १० गाळे असून १ बाय लोखंडी दरवाजे या बंधाऱ्यांना असतील. त्यामुळे वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर गावातील २९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.
पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी ३.८० कोटी रुपयांचा निधीत दुरूस्ती करत पाण्याच्या होणारी नासाडी थांबवली. याशिवाय १५.४० कोटी रुपयांचा निधी देऊन पाणी आडवण्यासाठी अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधले व तलावांचे खोलीकरण करत जलसाठा वाढवला. त्यामुळे सूक्ष्म सिंचनातून जमीन ओलिताखाली येऊ लागली आहे.
0 Comments