आ. कल्याणशेट्टी यांना पुन्हा सेवेची संधी द्या
दुधनी येथील सभेत केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन
अक्कलकोट : (कटूसत्य वृत्त) तालुक्याचा चौफेर विकास करून मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा सेवेची संधी देण्याचे आवाहन केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
दुधनी येथे भाजप महायुतीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. मोहोळ पुढे म्हणाले, अक्कलकोट तालुक्याला सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपाने युवा आमदार लाभला. गत २५ वर्षातील खुंटलेला विकास राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केला. अडीच वर्षात साडेतीन हजार कोटीहून अधिक विकास कामांपैकी काही सुरू तर काही कामे झालेली आहेत. तालुक्यातील वाड्या, वस्ती, तांडे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रस्ते, वीज, पाणी यासह विविध विकासकामे केल्याने पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दुसऱ्यांदा संधी देण्याचे आवाहन ना. यावेळी शहाजी पवार, चंद्रकांत पाटील, मोतीराम राठोड, संजय देशमुख, दिलीप सिध्दे, अविनाश मडीखांबे, अप्पू परमशेट्टी, महेश हिंडोळे, महेश पाटील, अरविंद ममनाबाद, अतुल मेळकुंडे, दत्ता शिंदे, रामचंद्र बिराजदार, शंकर भांजी, हणमंत कलशेट्टी, शिवराज स्वामी, सुरेखा होळीकट्टी, उत्तम गायकवाड, सिद्धाराम बाके, बाबा टक्कळकी, भीमा अंदेनी, बसवराज परमशेट्टी, बसवराज होदे, गुरुबाळ परमशेट्टी, अजय मुकणार, राहुल रुही, विश्वनाथ नागुर, मल्लिनाथ झळकी, सैदप्पा झळकी, जगन्नाथ जाधव, निर्मला गायकवाड यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्ये उपस्थित होते.
0 Comments