Hot Posts

6/recent/ticker-posts

आम्ही पुन्हा विकासाच्या पाठीशी राहणार

 आम्ही पुन्हा विकासाच्या पाठीशी राहणार

शेजबाभूळगाव अंकोली, औंढी ग्रामस्थांचा निर्धार; आ. माने प्रचारार्थ सभा





मोहोळ :(कटूसत्य वृत्त) राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी आमच्या गावांसाठी दिलेला भरघोस विकासनिधी आतापर्यंत कोणत्यात उमेदवाराने दिला नव्हता. त्यामुळे आम्ही पुन्हा विकासाच्या पाठीशी राहणार आहोत, असा विश्वास मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळगाव, अंकोली, औंढी यासह विविध गावांतील ग्रामस्थांनी माजी आमदार राजन पाटील व महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना प्रचारसभेत दिला.
२४७, मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील गाव भेट दौऱ्यात शेजबाभूळगाव, अंकोली, औढी यांसह विविध गावांना माजी आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाल्या. गावकऱ्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो असल्याचे माजी आमदार राजन पाटील व उमेदवार यशवंत माने यांनी सांगितले. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने म्हणाले की, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी
आमदार राजन पाटील यांच्यामुळे मला या मतदारसंघातून दुसऱ्यावेळी संधी मिळाली आहे. त्यासाठी मला सहकार्य करावे. यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments