महायुतीकडून पोहरागडसाठी भरीव तरतूद
धर्मगुरू रामदास महाराजांचे भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन
अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त) महायुती सत्तेत आल्यानंतर सर्वच जाती-धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यात विशेष करून बंजारा समाजाकडे त्यांनी लक्ष देऊन तीर्थक्षेत्र पोहरागडच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये दिले. त्यामुळे बंजारा समाजाने भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन धर्मगुरू रामदास महाराज यांनी केले.
रविवारी, जेऊरवाडी येथे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ केलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोल्ट होते.
रामदास महाराज म्हणाले, महायुती सरकारने बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संत सेवालाल समृध्दी योजना सुरू केली. केवळ योजना सुरू केली नाही तर त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली. खऱ्याअर्थाने न्याय देण्याचे काम या राज्यातील
सरकारने केले. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धर्मगुरू रामदास महाराज यांनी सर्व समाजबांधवांना भाजप महायुतीला मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तालुक्यात बंजारा समाजाची संख्या कमी असली तरी भाजपचे तालुकाध्यक्ष या समाजाला देऊन या समाजाला खऱ्याअर्थाने न्याय देण्याचे काम आम्ही केले. अनेक तांड्यांवर मोठ्या प्रमाणात निधी दिला. भविष्यातही अनेक योजना आणि निधी या समाजासाठी आपण देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, महिबूब मुल्ला, शिवलाल राठोड, परमेश्वर
यादवाड, संदीप राठोड, शिवाजी राठोड, महादेव चव्हाण, श्रीकांत चव्हाण, सिताराम राठोड, सेवालाल राठोड, पंडित चव्हाण, बंटी राठोड, रवि राठोड, सुरेखा राठोड, शिवलीला पाटील आदींसह भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments