Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ

 माढा मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ





माढा, (कटूसत्य वृत्त)
महाराष्ट्राला देशामध्ये एक नंबरचे राज्य बनवायचे असेल तर सत्ता परिवर्तन गरजेचे आहे. ही निवडणूक भाजपविरूद्ध शरदचंद्र पवार असून या निवडणुकीत जनता ही पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राज्याबरोबरच माढा मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले.


ते महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी रोहित पवारम्हणाले की, भाजपने नेहमी गुजरातला प्रथम प्राधान्य देऊन महाराष्ट्राला दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. भाजपच्या या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्राला
पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शरद पवार हे अहोरात्र परिश्रम घेत असून महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे= उभी आहे. याचा परिणाम माढा मतदारसंघात होणार असून महाराष्ट्राप्रमाणेच माढा मतदारसंघामध्ये परिवर्तन होणे
अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

माढा मतदारसंघात शेतकऱ्यांना ऊस गाळपाची भीती दाखवून महाविकास आघाडीला मतदान करण्यास रोखले जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी कुठलीही भीती न बाळगता मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, माढा मतदारसंघातील सर्व ऊस विठ्ठल कारखान्यांकडून गाळप केला जाईल. वेळ पडल्यास आपण स्वतः नफा-तोट्याचा विचार न करता जामखेडच्या कारखान्यात उसाचे गाळप करू, परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. द्राक्ष बागायतदार व बेदाणा उत्पादकांच्या समस्येबाबत आमदार शिंदे यांच्याकडून घेण्यात आलेल्या शेतकरी विरोधी भूमिकेवर टीका करताना पवार म्हणाले की, द्राक्ष बागायतदार व
बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नितीन कापसे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यमान आमदारांनी पाठिंबा देण्याचे सोडून त्यांना विरोध दर्शविल्याने या भागातील शेतकरी त्यांच्यावर नाराज झाला असून या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असूनही विद्यमान आम दारांनी श्रद्धास्थान असलेल्या अरण येथे भक्तनिवास बांधले नसल्याची खंत व्यक्त करताना आमदार शिंदे हे केवळ उसाच्या कारखान्यावर राजकार
ण करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments