Hot Posts

6/recent/ticker-posts

वंदेमातरम ॲटोरीक्षा-स्कूलबस संघटनेचा कोठेंना पाठींबा - राहुल गोवित्रीकर,

 वंदेमातरम ॲटोरीक्षा-स्कूलबस संघटनेचा कोठेंना पाठींबा - राहुल गोवित्रीकर,



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वंदेमातरम ॲटोरीक्षा व स्कूलबस संघटनेच्या सर्व सभासद बांधवांची बैठक संघटनेचे शहर अध्यक्ष राहुल गोवित्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून सदर बैठकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून देवेंद्र कोठे यांनाच निवडून आणण्याचा निर्धार वंदेमातरम ॲटोरीक्षा व स्कूलबस चालकांच्या सभासदांनी व्यक्त केला आहे.


देवेंद्र कोठे हे एक तरुण, हुशार, अनुभवी, सुसंस्कृत, प्रामाणिक व निष्कलंक उमेदवार असल्याने त्यांनाच येत्या विधानसभेत पाठविण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे असे संघटनेचे शहर अध्यक्ष राहुल गोवित्रीकर यांनी सांगितले आहे.


वंदेमातरम ॲटोरीक्षा व स्कूलबस संघटना ही एक सोलापूर शहरात नावाजलेली संघटना असून सोलापूर शहरात सन २००२ सालापासून कार्यरत आहे. सदर संघटनेचे एकूण ७०० सभासद आहेत. सदर संघटनेच्या माध्यमातून भव्य रीक्षा भवन देखील बांधलेले असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजिक उपक्रम सतत राबविले जातात.


तरी आम्ही संघटनेच्या सर्व सभासदांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून देवेंद्र कोठे यांच्या कमळ चिन्हाचे बटन दाबून विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे शहर अध्यक्ष हुल गोवित्रीकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे. सदर प्रसंगी सेक्रेटरी रविंद्र बटगेरी, अक्षय गायकवाड, मोहन जाधव, रफिक शेख, शिवानंद प्याटी, किशोर दिकित, रफिक सय्यद, श्रीनिवास कोळी, राजु परदेशी, सुहास ढमढेरे, राजेंद्र दिकित यांच्यासह वंदेमातरम ॲटोरीक्षा व स्कूलबस संघटनेचे सर्व सभासद व कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments