Hot Posts

6/recent/ticker-posts

संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबबदारी - योगेंद्र यादव

संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबबदारी - योगेंद्र यादव


 
भारत जोडो अभियानातून  विधानसभा निवडणूक जनजागरण संवाद 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, ज्यांना या देशाचे संविधान मान्य नव्हते तेच सत्तेत आहेत.त्यामुळेच
संविधानिक मूल्ये सध्याच्या राजवटीत पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत.लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.हे थांबवायचं असेल तर लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने देशविघातक शक्तीला मतदानातून रोखलं पाहिजे देश आणि संविधानाचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असे विचार
भारत जोडो अभियानचे संयोजक योगेंद्रजी यादव यांनी मोहोळ येथे व्यक्त करून करून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
शनिवारी ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं ४ वाजता लोकसेवा कॉन्फरन्स हॉल,कुरुल रोड मोहोळ या
ठिकाणी भारत जोडो अभियानचे संयोजक मा. योगेंद्रजी यादव यांच्यासह  प्रमुख वक्ते उल्का महाजन ,संजय मंगो ,डॉ.सुनिलम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.गोविंद पाटील होते.
यावेळी वरील वक्त्यांनी बोलताना सांगितले की , 'लोकशाही यंत्रणांचे खच्चीकरण सुरू आहे. देशातील अल्पसंख्याक,आदिवासी, दलित व महिलां वरील अत्याचार मोठ्‌या प्रमाणावर सुरू आहेत.एका बाजूला बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या वाटा बंद करत,लोकशाही व्यवस्थाच संपवण्याचा डाव सातत्याने सुरू आहे.देशातील बेरोजगारी व विषमता शिगेला पोहोचली आहे.शिव-फुले-शाहू आंबेडकर-सावित्रीबाई आणि अहिल्यामाई-फातिमा यांचे सामाजिक न्याय, समानता आणि बंधुताचे विचार नष्ट करून संविधानाने दिलेले अधिकार छुप्या पद्धतीने नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले जात आहे.अनेक सामाजिक विचारवंत, साहित्यिक,कलाकार, प्रामाणिक अधिकारी दडपणाखाली असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या काही वर्षात सर्व स्तरावर देशाची पीछेहाट सुरु आहे.महाराष्ट्राचीही यापेक्षा वेगळी परस्थिती नाही.महाराष्ट्राला आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक सभ्यतेची संस्कृती लाभली आहे.मात्र राजकारणातील नैतिकता आणि विचारधारा धाब्यावर बसवून गेल्या काही वर्षांत शासन, सरकारी यंत्रणा याचा गैरवापर केला जात आहे.सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्रा च्या आजवरच्या ५०-६० वर्षांच्या सामाजिक
आणि सांस्कृतिक वाटचालीला गालबोट लावले जात आहे.जात-पात आणि धर्माच्या नावावर समाजातील सलोखा बिघडवून सत्ता कायम ठेवण्यासाठी अवैध आणि संविधानिक चौकटीत न बसणारी कृत्ये वारंवार केली जात आहेत.यात कुठेही महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा विचार आणि धोरण दिसत नाही. तात्पुरत्या घोषणा आणि लोभ दाखवून विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हे असेच सुरु राहिले तर याचा महाराष्ट्राच्या विकासाव र दूरगामी परिणाम होणार असून ते परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील.या परिस्थितीचा गांभी र्याने विचार करण्याची वेळ आली आहे.प्रत्येक नागरिकासाठी न्याय,स्वातंत्र्य,समता,आणि बंधुत्वाचे घटनात्मक वचन सुरक्षित राखण्यासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्राची एकता आणि सामाजिक सलोखा बिघडवू पाहणाऱ्या मनुवादी आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकातील परिवर्तनशील विचाराच्या व्यक्ती, संघटना यांनी
एकत्रित येऊन पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले .
यावेळी आकाश फाटे ,मनोज मोरे, धर्मराज चवरे,शशिकांत ठोकळे ,पांडुरंग सुरवसे,राजेंद्र फडतरे, सिताराम केवळे ,मनोहर गोडसे,प्रशांत माने, चंद्रकांत फाटे ,विनय पाटील ,रमेश बारसकर ,शंकर ढगे,श्री जगताप ,बाळासाहेब जाधव ,बंटी आवारे ,नागनाथ मुळे ,अनिल कोरे, रजनीश कसबे, संजय भोसले , मोहन कादे , दिपक पारडे ,सुरेश साठे ,रमेश साठे  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक विनोद कांबळे यांनी ,सुत्रसंचालन शिलवंत क्षीरसागर यांनी , तर आभार बिरमल खांडेकर यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments