विकासकामांमुळे जनता अपप्रचाराला बळी पडणार नाही
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वैरागमध्ये दुय्यम निबंध कार्यालय आहे. अनगरच्या दुय्यम निबंधक कार्यालय प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी असणाऱ्या स्नेहसंबंधामुळे अनगरला अप्पर कार्यालय मंजूर झाले आहे. ते कार्यालय जनसामान्यांच्या हितासाठीच आहे. त्या परिसरातील कोणाचीही याबाबत तक्रार नाही. केवळ विरोधक अप्प्रचार करत आहे. मात्र,आ.यशवंत माने यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहता जनता अप्प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केला.मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.यशवंत माने यांच्या प्रचारार्थ एकुरके, भोयरे व मलिकपेठ,घाटणे, आढेगाव सौंदणे, तांबोळे व पोखरापूर गावांना भेटी दिल्या. यावेळी पोखरापूर येथील सभेत ते बोलत होते.राजन पाटील पुढे म्हणाले, आष्टी उपसा सिंचन योजनेतून पोखरापूर तलावात पाणी सोडण्याच प्रश्न आता मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील उर्वरित प्रश्न मार्गी लागतील.यावेळी उमेदवार यशवंत माने म्हणाले, तुम्ही भूमिपुत्राला उमेदवारी देऊ म्हणाले होते. भूमिपुत्राची शिफारस पैसे नाहीत म्हणून केले नाही का, म्हणून तुम्ही लक्ष्मीपुत्र आणला आहे का. त्यामुळे तुम्हाला नागनाथ महाराज माफ करणार नाहीत.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षप्रकाश चवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दादाराव पवार, भाजपाचे जेष्ठ नेते संजीव खिलारे, बाळासाहेब भोसले, संतोष जाधव, सिंधुताई वाघमारे,सुरेखा बाबर, चंद्रहार चव्हाण, बाळासाहेब पाटील, नानासाहेब डोंगरे, रमेश डोंगरे,प्रविण डोंगरे, विठ्ठल डोंगरे, विकास डोंगरे, भारत सुतकर, विकास कोकाटे,सचिन भानवसे, शिवाजी सोनवणे,माऊली चव्हाण, शिवाजी चव्हाण.विजय कोकाटे, संभाजी कोकाटे, पोपट हांडे आदी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments