Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्याचं नंदनवन करणार-आ.यशंवत माने

 मोहोळ तालुक्याचं नंदनवन करणार-आ.यशंवत माने



राजन पाटलांसह अनेक नेतेमंडळींची हजेरी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा बोलायला नाही. राजकारण हे विकासाचं, तथा विचारचं असावं किंवा द्वेषाच नसावं, असे मोहोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आ.यशंवत माने यांनी सांगतानाच, या तालुक्याच्या चौफेर विकासासाठी आपण कटिबद्ध असून तालुक्याचं नंदनवन करण्यासाठी पुन्हा एकदा आपणास संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी आयोजित प्रचार सभांमध्ये केले.मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.यशवंत माने यांच्या प्रचारार्थ, मलिकपेठ,घाटणे आढेगाव सौंदणे, तांबोळे व पोखरापूर येथे माजी आ. राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार आ. यशवंत माने प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा झाल्या त्यावेळी आ.माने बोलत होते.यावेळी माने पुढे म्हणाले, मोहोळ मतदार संघामध्ये मी नवखा उमेदवार म्हणून जेव्हा आ. राजन पाटील यांनी मला मतदारसंघांमध्ये संधी दिली त्या संधीचे मी सोने करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्याचा तसेच मतदार संघाचा अभ्यास करून विविध गावांमध्ये सर्व समान विकास निधीचा मी समान वाटप केले असून आजपर्यंत साडेतीन हजार कोटीचा विकास निधी आणल्याचा मला खूप आनंद आहे.
आजपर्यंत तालुक्यातील रस्त्यांची समस्या असो, गटारची समस्या असो, शेतीच्या पाण्याची समस्या असो तसेच मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा असो विजेची अडचण असो ती सुद्धा आपण दूर केली असून तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी सबस्टेशन नव्याने निर्माण करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उपजिल्हा रुग्णालय या सर्व गोष्टींचे आपण पूर्तता केलेली आहे, असे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश चवरे, दादा पवार, संजीव खिलारे, बाळासाहेब भोसले, संतोष जाधव, सिंधू वाघमारे, सुरेखा बाबर, चंद्रहार चव्हाण, नरोटे बाळासाहेब पाटील, आढेगावचे नानासाहेब डोंगरे, रमेश डोंगरे, प्रविण डोंगरे, विठ्ठल डोंगरे, विकास डोंगरे सौंदणेचे भारत सुतकर, विकास कोकाटे,सचिन भानवसे, शिवाजी सोनवणे सर,माऊली चव्हाण, शिवाजी चव्हाण. तांबोळेचे विजय कोकाटे, संभाजी कोकाटे, पोपट हांडे,रावसाहेब नागणे, तानाजी नागणे, सागर पवार, रमेश फाटे, पोखरापूरचे यशवंत नरोटे सोमादेव वाघमोडे, बालजी नरुटे, दत्तात्रय काकडे, हर्षद दळवे, सिध्दराम नरुटे, सिंधू वाघमारे, धोंडिराम लेंगरे, रामकुमार दळवे,राजूदेव वाघमोडे, चंदूदेव वाघमोडे, शंकर देव वाघमोडे, दादाराव वाघमोडे, बापू लेंगरे, मधू वाघमोडे, अंकुश दळवी यांच्यासह सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments