Hot Posts

6/recent/ticker-posts

अखेर दिलीप माने उतरले सोलापूर दक्षिणच्या मैदानात !

 अखेर दिलीप माने उतरले सोलापूर दक्षिणच्या मैदानात!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचे बी फार्म न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली होती पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा झाली.


शेवटी दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. नंदुरपासून दिलीप माने यांच्या उपस्थितीत काडादी यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

दिलीप माने हे काडादी यांच्या प्रचारासाठी उतरले असल्याने निश्चितच काडादी यांची ताकद वाढली आहे. दिलीप माने यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची संपूर्ण मतदार संघात बांधणी आहे. शहरी भागात कार्यकर्त्यांचे मोठी ताकद आहे. ही सर्व ताकद आता काडादी यांना मिळणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments