Hot Posts

6/recent/ticker-posts

वाखरीत शहीद स्मारक येथे शहिदांना आदरांजली

 वाखरीत शहीद स्मारक येथे शहिदांना आदरांजली



पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांच्या आठव्या पुण्यस्मरण
दिनानिमित्त दि. २९ नोव्हेंबर रोजी वाखरी (ता. पंढरपूर) येथील  शहीद स्मारक येथे मान्यवरांच्या
हस्ते आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक कल्याण विभाग, पुणेचे संचालक कर्नल दिपक ठोंगे उपस्थित होते.यानिमित्ताने पंढरपूर येथे मुन्नागीर गोसावी यांच्या निवासस्थानी
आयोजित शिबीरात ७१ जणांनी रक्तदान केले. वाखरी येथील कार्यक्रमात आ. अभिजीत पाटील,प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, प्रणव परिचारक, शहीद कुणाल गोसावी यांचे पिता मुन्नागीर गोसावी, सैनिक कल्याण विभाग सोलापूरचे तुंगारे, लेप्ट कर्नल रामदास बोंगे,वाखरीचे उपसरपंच चव्हाण मान्यवरांच्या उपस्थितीत वीरपत्नी लक्ष्मी महादेव पवार (सांगली),सोनाली रामचंद्र घाडगे (पंढरपूर),पूजा शंकर उकळीकर (कराड),सुनिता अनिल कळसे (कराड),मंगल नंदकुमार फराटे (पुणे),गोदावरी पांडुरंग तावरे (बीड),शहीद स्मारक येथे वीरपत्नी, वीर मातांचा सन्मान करताना आ. अभिजीत पाटील. सोबत मुन्नागीर गोसावी, वृंदा गोसावी,कर्नल दीपक ठोंगे, तुंगारे, रामदास बोंगे आदी.यशोदा केशव गोसावी (सिन्नर),वैशाली अमोर गोरे (वाशिम),बेबी संपतराव भोईटे (सातारा), अर्जना बालाजी इबुकवाड (पुणे), शिवानी तेजसिंह साळुंखे (सोनंद) या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुन्नागीर गोसावी व वृंदा गोसावी यांच्या वतीने पंढरपूर येथील गायत्री मासाळ व सानिका ऐवळे या दोन महिला धावपटूंना शूजसाठी २० हजार रूपयांची रक्कम देण्यात आली. यानिमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शहीद मेजर कुणालगीर गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोसावी, सचिव महेश गोसावी, डिंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश बुवा यांनी केले. आभार महेश म्हेत्रे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments