कर्मकांडाला फाटा देत शाळेला केली मदत
पापरी (कटूसत्य वृत्त):- कोन्हेरी (ता.मोहोळ) येथील ग्रामस्थ स्व. अनिल आप्पा शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे पुत्र शरद शेळके यांनी ११ विद्यार्थ्यांच्या हिताला मदत हीच आदरांजली देणगी विद्यार्थ्यांच्या हजार १११ रुपयांची शाळेसाठी दिली, तसेच शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना फळे आणि लाडूंचे वाटपही केले. शाळा प्राप्त झालेल्या देणगीतून आरोग्यासाठी शुद्ध पिण्याचे पाण्याच्या आर.ओ प्लांटसाठी पत्रा शेड खोली तयार करणार आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका पद्मावती डुबल यांनी सांगितली. शेळके यांनी वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रुढी परंपरांसाठी होणारा खर्च टाळून त्या खर्चाचा उपयोग शाळेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत कोन्हेरीसह ग्रामस्थांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. दरम्यान शाळेत - स्व. अनिल शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात माझ्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मी जुन्या रूढीपरंपरा यांना फाटा देत त्यावर होणारा खर्च गावच्या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी देणगी स्वरूपात शाळेस दिला. प्रत्येकाने आता रूढी परंपरा यात गुरफटत बसण्यापेक्षा बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक विचारसरणी जोपासत समाजात वावरले पाहिजे.शरद शेळके, ग्रामस्थ कोन्हेरी आले, नंतर सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि लाडू वाटप करण्यात आले, शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मावती परिसरातील डुबल यांच्याकडे शेळके यांनी देणगी सुपूर्द केली. यावेळी बाळासाहेब शेळके, विजय मगर रामचंद्र शेळके यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments