Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील भाजप नेते यांचा संकल्प....

 माळशिरस तालुक्यातील भाजप नेते यांचा संकल्प...

राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार

माळशिरस (कटूसत्य वृत्त):-  माळशिरस तालुक्यातील भाजप नेते, पुढारी, कार्यकर्ते एकवटले असून, माळशिरस तालुक्यातील नगरपरिषद,ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणूका माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

    यावेळी सोपान नारनवर, हनुमंत सुळ,बाळासाहेब सरगर, बाजीराव काटकर, सुजय माने पाटील, बाळासाहेब वावरे,संजय देशमुख, महादेव कावळे, लक्ष्मण गोरव, राहुल मदने, शरद मदने, राहुल पदमन, भैय्या चांगल,शिवराज पोळके, रणजीत ठवरे, रणजीत मोठे, दादासाहेब खरात, रितेश पालवे, संतोष वाघांबरे,देविदास वाघमोडे,लक्ष्मण माने,वैभव शहा, शाहिद शेख,हरिदास पाटील, प्रशांत ताटे, लहू धाइंजे,अंकुश धाइंजे,डॉ. निलेश ननवरे यांच्यासह महायुतीचे नेते, पुढारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

       पुढे बोलताना डॉ.आप्पासाहेब देशमुख म्हणाले, आमचा संकल्प आहे, महायुतीच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन, माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असून,पंचायत समितीवरती महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना डॉ.आप्पासाहेब देशमुख म्हणाले,भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय थोडक्यात बाजूला झाला. माळशिरस तालुक्यातील जनता घराणेशाहीच्या मागे नाही तर विकासाच्या मागे आहे हे त्यांनी दाखवून दिले. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ताकतीने लढवणार आहे. तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आप्पासाहेब देशमुख म्हणाले की राम सातपुते यांनी घर विकले नाही ते कोठेही जाणार नाहीत, ते इथले रहिवासी झाले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. आप्पासाहेब देशमुख म्हणाले, आमदारकीची निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास नक्कीच लढवणार असल्याचे ते   म्हणाले.यावेळी महायुतीच्या अनेक पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments