Hot Posts

6/recent/ticker-posts

दीपावली पाडव्यानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सौ सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देऊन घेतले शुभाशीर्वाद

 दीपावली पाडव्यानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सौ सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देऊन घेतले शुभाशीर्वाद

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  शनिवारी दिवाळी पाडवा निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथील काटेवाडी फार्म हाऊस येथे प्रथमच त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी उत्सव साजरा केला. दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठे गर्दी केली होती दरम्यान यावेळी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार यांचा विशेष सत्कार करून गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन शुभाशीर्वाद घेतले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे,महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा राष्ट्रवादी प्रदेश महिला अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या मूळ गावी शेळगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे जेष्ठ बंधू शिक्षण सम्राट माने गुरुजी यांना देखील शुभेच्छा देण्यात आले,ज्येष्ठ लेखक, उपराकार, तथा माजी आमदार लक्ष्मण माने, यांचा देखील यावेळी शाल व गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, महादेव राठोड, पवन बेरे, यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments