सावंत गटाचा रविवारी मेळावा वाकाव येथे आयोजन
माढा विधानसभेसाठीची निर्णायक भूमिका ठरणार - प्रा.शिवाजीराव सावंताच्या भुमिकेककडे लक्ष
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींवर विचार विनिमय करून व कार्यकर्त्याची मते जाणून घेऊन राजकीय निर्णय घेण्यासाठी रविवारी ३ ऑक्टोबर रोजी वाकाव ता.माढा येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती माजी ता.प.सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी दिली.
रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ,जयवंत बंगल्या समोरील प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी यापूर्वी माढ्यात मेळावा घेत माढा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची भुमीका मांडली होती.
माढा विधानसभेची जागा महायुतीमधुन अजित पवाराच्या राष्ट्रवादीला गेली.अजित पवार गटातुन निवडणुक लढविण्यासाठी प्रा.शिवाजीराव सावंत यांचे
पुत्र पृथ्वीराज सावंत यांचेसह शरद पवार गटाचे नेते शिवाजी कांबळे यांनी इच्छुक असल्याचे सांगत तिकीटाची मागणी केली होती.मात्र नाट्यमय घडामोडीनंतर
मविआ मधील काँग्रेस पक्षाच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी काॅग्रेस पक्षातुन राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करुन थेट तिकीट मिळवत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.अॅड.साठेनी अर्ज दाखल करताना महायुतीतील इतर घटक पक्षाचे खास करुन भाजपसह -शिवसेना सावंत परिवारातील कोणीही उपस्थित नव्हते.पृथ्वीराज सावंत हे जि.प.चे. माजी सभापती शिवाजी कांबळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना मात्र आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात.या मेळाव्यात प्रा.शिवाजीराव सावंत महायुतीचा धर्म पाळण्याची घोषणा करतील की अन्य वेगळी राजकीय भुमिका मांडतील हे पहावं लागणार असुन माढा मतदार संघात प्रा.शिवाजीराव सावंत यांना मानणारा स्वतंत्र गट असुन सावंताची भुमिका माढ्यात निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे सावंताच्या मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments