लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये अधिकारी आपल्या भेटीला मार्गदर्शन शिबिर संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनि. कॉलेज टेंभुर्णी येथे अधिकारी घडविणारी शाळा या ब्रीद वाक्याचा अनुसरून अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा. संदेश देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासातील उदासीनता घालवली पाहिजे कारण जग वेगाने बदलत आहे. स्पर्धेच्या युगात वावरताना आपल्याला मोबाईलचा वापर हा केवळ माहिती व ज्ञानासाठीच करावा लागेल. प्राथमिक शिक्षणचा पायाच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत तारेल. स्वप्न पाहायला मागे पडू नका ज्ञानाला कोणतीच मर्यादा नसते आणि अभ्यास ही काही तासात मोजायची गोष्ट नाही अशी अनेक उदाहरणे यावेळी सांगितली.
तसेच मंगेश काशीद सर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षण पैसे कमावण्याचे साधन नसून ते ज्ञानग्रहण करण्याचे साधन आहे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य विकास करळे यांनी मा. संदेश देशमुख यांच्या घरची सर्व परिस्थिती संकटाच्या परिस्थितीवर केलेली मात याविषयी पडद्यामागची भूमिका स्पष्ट केली. संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिवा सुरज बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी मा. संदेश देशमुख, शै. संचालक मंगेश काशीद, प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments