राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले त्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष मा.अक्षय भांड यांनी सत्कार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री असलेली फोटो फ्रेम भेट देऊन मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महायुतीचे चांगले काम केले आपण सर्वांनी चांगली लढत दिली माळशिरस तालुक्याच्या प्रश्नांनकडे माझे वयक्तिक लक्ष राहील माळशिरस तालुक्यासाठी काय लागले ते सांगा मी देण्यास तयार असल्याचे उदगार मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
0 Comments