Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी आमदार कदमांच्या कार्यकर्त्यांचा महायुतीला पाठिंबा

 माजी आमदार कदमांच्या कार्यकर्त्यांचा महायुतीला पाठिंबा 




मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करून ती दुसऱ्या उमेदवाराला दिल्यामुळे नाराज झालेल्या कदम यांच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना पाठिंबा देण्याचा निर्णय नुकताच घेतला.


माजी आमदार कदम यांनी मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते

पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यानंतर पवार यांनी महाविकास आघाडीकडून माजी आमदार कदम यांची उच्चशिक्षित कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान एका रात्रीत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे  सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. यामुळे कदम यांच्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरली होती. मंगळवारी मोहोळ येथे कार्यकत्यांनीच बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला

Reactions

Post a Comment

0 Comments