Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनेते यंदा करणार ७ लाख मेट्रिक टन गाळप-पाटील

 लोकनेते यंदा करणार ७ लाख मेट्रिक टन गाळप-पाटील



अनगर (कटूसत्य वृत्त) :- लोकनेते कारखान्याने संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित साधत यंदाच्या २०२४-२५ या गळीत हंगामासाठी कारखान्याने तब्बल सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याची अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले.


 लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी पिरटाकळी (ता. मोहोळ) येथील ऊस उत्पादक शेतकरी विलास मिसाळ व त्यांच्या पत्नी कांचन या उभयतांनी सत्यनारायण पूजा केल्यानंतर विधीवत बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यानंतर माध्यमाशी बोलताना अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले, मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी मागील वर्षी पावसाअभावी आपाल्या जीवापाड सांभाळलेल्या उसाच्या नोंदीलोकनेते कार्तकी पारीखरठी रेल्वेच्या ४३ जादा फेऱ्या यावेळी संस्थापक अध्यक्ष राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा कारखान्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत ऊस गळितासाठी अन्यत्र देऊ नये. यावर्षी ऊस अतिरिक्त होणार नसल्याने प्रत्येक उत्पादकाचा ऊस अगदी शिस्तबद्ध नियोजनानुसार वेळेत गाळपासाठी आणला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊस तोडणीसाठी बैलगाडी ३५०, डंपिंग ट्रॅक्टर व ट्रक ५०० आणि अत्याधुनिक ऊस तोडणी यंत्र १२, अशी यंत्रणा आहे. वाहतूक आणि तोडणी यंत्रणेशी कारखाना प्रशासनाने रीतसर करार करून त्यांना अॅडव्हान्स अदा केला आहे. याशिवाय ऊस उत्पादकांना उसापोटीची मागील वर्षाची पूर्ण एफ.आर.पी. दिली असून कर्मचाऱ्यांचे पगार देखील पूर्णता दिले आहेत. तसेच वेळोवेळी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी  आणि फंड अदा केल्याचेही ते म्हणाले.


यावेळी संस्थापक अध्यक्ष राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा  पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, संचालक प्रकाश चवरे, शुक्राचार्य हावळे, सुधीर पवार, संभाजी चव्हाण, अशोक चव्हाण, माजी चेअरमन हनुमंत बप्पा पोटरे, संदीप पवार, मदनसिंह पाटील, दत्ताराज पवार, अतुल जगताप हे उपस्थित होते. कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, मुख्य अभियंता लक्ष्मण मुखेकर, चीफ केमिस्ट के. डी. वैद्य, शेती अधिकारी म. इसाक देशमुख, आसवनी विभागाचे रावसाहेब अवताडे, डेप्युटी चीफ इंजिनिअर संजय खुडे, संगणक प्रमुख राजशेखर गायकवाड, सोमनाथ म्हेत्रे, अनंता उरणे, घनाजी मोटे, रणजित सावंत यांन सहकार्य केले.

Reactions

Post a Comment

0 Comments