माढ्यात दौंड कलबुर्गी रेल्वे सुरु,माढा प्रवासी संघाने केले रेल्वेचे स्वागत
माढा (कटूसत्य वृत्त):-
दौंड-कलबुर्गी - दौंड डेमो ही गाडी दिवाळी सणानिमित्त सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. माढा येथे दौंड ते कलबुर्गी या दिवाळी विशेष रेल्वे गाडीचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच माढा प्रवासी संघटनेकडून लोकोपायलट यांचा पेढा भरवून स्वागत करण्यात आले. पाच वर्षांपासून बंद असलेली गाडी सुरू झाल्याने विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे.
रेल्वे संघटनेच्या वतीने या प्रश्नी पाठपुरावा केला होता. कायमस्वरुपी गाडी सुरू करण्याची मागणी रेल्वे संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला यश आले आहे.
सदर गाडीला माढा रेल्वे स्टेशनला थांबा देण्यात आलेला आहे. या गाडीने केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, दुधनी, तिलाटी, गाणगापूर, कलबुर्गीकडे जाणाऱ्यांसाठी विशेष फायदा होणार आहे. तसेच भिगवण, पारेवाडी, दौंड येथे ही संध्याकाळी जाता येणार आहे. सदर गाडी सकाळी माढा येथे सकाळी साडेसात वाजता येणार असून ती सोलापूरला सकाळी ८:४० मी.वाजता पोहोचते व सायंकाळी सोलापूरहून ६:४० मिनिटांनी निघून रात्री साडेसात वातजा पोहोचते. त्यामुळे या गाडीचा फायदा गाणगापूर देवदर्शनासाठी तसेच सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
0 Comments