*शेतकरी म्हणजे बळीराजा परंतु शेतमालाला हमी भाव कायदा असतानाही लागू होत नाही हे दुर्दैव्य - डॉ.बाबा आढाव*
*कष्टकरी आणि कष्टकऱ्यांना नाकारणारी संस्कृतीचा धिक्कार करीत बळीराजाला सुगीचे दिवस येवो - डॉ.अभिजित वैद्य*
पुणे-सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यात विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी दि.2 नोव्हेंबर 24 रोजी सकाळी 11 ते दु.2 पर्यंत काढण्यात आली यंदाचे 21 वे वर्ष होते.
यावेळी प्रथम समाजसेवक डॉ.अभिजित वैद्य आणि ॲड. शारदा वाडेकर यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला भव्य पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
यावेळी डॉ.वैद्य प्रतिपादन करताना म्हणाले की ब्राह्मणी आणि अब्राह्मणी तसेच वैदिक आणि अवैदिक परंपरा आजही आपल्याला भरपूर प्रमाणात आढळत आहे. वामन प्रवृत्ती वाढण्यासाठी आपलेच बहुजन समाज मदत करीत आहे त्यामुळेच छलकपटाने बळीराजाचा घात होत आहे.त्यामुळे आजही खर्या अर्थाने कष्टकरी आणि कष्टकऱ्यांना नाकारणारी संस्कृतीचा धिक्कार करीत बळीराजाला सुगीचे दिवस येवो म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया म्हणजे खेड्यातील महिलांचे इडा पिडा टळु दे बळीच राज्य येऊ दे हे बोल नक्कीच खरे ठरेल
या प्रसंगी बाबा आढाव म्हणाले की *शेतकरी म्हणजे बळीराजा परंतु शेतमालाला हमी भाव कायदा असतानाही लागू होत नाही हे दुर्दैव्य गेली अनेक वर्ष कोणतेही सरकार आले तरी बळीराजा सुखावेल अशी कामे कधीही करीत नाही.त्यामुळे आपल्याला न्याय मिळविण्यासाठी तसेच शेतकरी कष्टकरी यांना पेन्शन योजना लागू होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल असे देखील बाबा म्हणाले.
यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिका प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की बळीराजाच्या काळात शेतकऱ्या वर कधीही संकट आले नाही ते राज्य महिलांसाठी व शेतकऱ्यासाठी खूप आनंददायी चांगले होते ते दिवस पुन्हा येण्यासाठी बहुजनांनी एकत्र येऊन योग्य प्रतिनिधी पाहून बळीराजा साठी काय करणार याची पडताळणी करूनच मतदान करावे असे आव्हान करीत 2024 महत्वाचे वर्ष असल्याचे सांगितले.
लाल महालात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि राजेंद्र शेलार व नवनाथ लोंढे पुष्पहार अर्पण केला. समारोप प्रसंगी प्रा.बाबासाहेब देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर प्रेरणादायी गाणे म्हंटले तर सत्याचा अखंड कु.शांती चव्हाण हिने सुंदर आवाजात गाऊन टाळ्यांनी दाद मिळविली. आणि आभराचे काम सत्यशोधक सचिन बगाडे यांनी मानले.
या.वेळी ॲड.मोहन वाडेकर , अंकल सोनवणे,महेश बनकर,अंजुम इनामदार, विठ्ठल सातव, मधुकर राऊत, मारुती जाधव,आशा ढोक मंगल कांबळे, शिल्पा शिरवणकर अनेक मान्यवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोलाची मदत ,प्रवीण - प्रतिक परदेशी, आप्पाराव चव्हाण, वामन वळवी, क्षितिज ढोक , गाथा परदेशी ,यांनी केली.
बळीराजाचा जयघोष *ईडा पीडा टळू दे बळीराजाच राज्य येऊ दे* हा जयघोष व महापुरुषांचे नावांनच्या घोषणानी आणि अमर बँड च्या देशभक्तीपर आणि शेतकरी, बळीराजावरील सुमधुर गीतांनी फुले वाडा ते लाल महाल मिरवणूक दरम्यान परिसर घुमघुमला होता.यावेळी मान्यवरांचे कृषिधनाने स्वागत केले तर बळीराजाच्या हस्ते सर्वाना कृषिधन,फळभाज्याचे वाटप करण्यात आले.
तर दिवाळी निमित्त नागपूर व इतरत्र ठिकाणावरून आलेल्या कुटुंबांनी लाल महालात विश्व सम्राट बळीराजा सोबत अनेकांनी फोटो काढले.
0 Comments