Hot Posts

6/recent/ticker-posts

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते विधानसभा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन


विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते



 विधानसभा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन







सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विधानसभा पूर्वपिठीका माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते करण्यात आले.

 जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम.राजकुमारपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमनिवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभारपोलीस शहर उपायुक्त दिपाली काळेअतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितम यावलकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळीउपजिल्हाधिकारी (महसूल ) अमृत नाटेकर जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्यासह सर्व नोडल अधिकारीसर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

   जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या निवडणूक पूर्वपिठीकेत सन १९९० ते सन २०१९ तसेच सन २०२१ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक या सदंर्भातील माहिती देण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रमविधानसभा मतदारनिहाय अंतिम मतदारांची आकडेवारी विधानसभा मतदारनिहाय निवडणूक निर्णय अधिकारीसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीनिवडणुकीसाठी नियुक्त समितीत्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.नियंत्रण कक्ष क्रमांकनिवडणूक आचारसंहिता काय करावेकाय करु नयेप्रचार संबंधितच्या सूचनापेड न्यूजप्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वेसमाज माध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आदींची माहिती देण्यात आली आहे.जिल्हा माध्यम कक्षचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी संपादित केलेल्या या पूर्वपिठीकेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नि-हाळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

-------------

चौकट मजकूर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली पूर्वपिठीका माहिती पुस्तिका ही जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार 

Reactions

Post a Comment

0 Comments