मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 13, 2024

मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका

 मतपेढीचेजातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका

 

समृद्धसंपन्न देश आणि राज्यासाठी महायुतीला कौल द्या

 

दुर्गापूर येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन





  मुंबई  ( कटूसत्य वृत्त ) देशराज्य आणि जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार अविरत काम करत आहे. देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महाशक्ती बनवायचे असेलराज्याचाचंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीला दुसरा पर्यायच नाही. मतपेढीचे आणि जातीजातीमध्ये विष कालवण्याचे हीन राजकारण करणा-यांना दूर लोटा आणि महायुतीला कौल द्या असे आवाहन केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवारवन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेलजिल्हाध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते या निवडणुकीत श्री. मुनगंटीवार यांना निवडून आणाल तर यापुढे ही चंद्रपूर जिल्हा विकासाची ट्रेन तिप्पट वेगाने धावेल असा विश्वास ही श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. 

लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जातीधर्मा पलिकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे. मात्र विरोधकांना केवळ जातीपातीचे राजकारण करायचे आहे अशी टीका श्री. गडकरी यांनी केली. आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शेतक-याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बांबू पासून मिथेनॉलबायो एव्हिएशन इंधन निर्मिती चंद्रपूर येथे होत असूनशेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे. बल्लारपूर येथे मिथेनॉल सोबतचअमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचेही ते म्हणाले. पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला आहे. श्री. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नामुळे ताडोबा जंगलात आज वायु आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या लवकरच धावणार आहेत असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या बळावर आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळे 2014 पूर्वी एक ही किमी चा राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकारमुळे तब्बल 474 किमी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आहे.   नुकतेच नागपूर विमानतळाचे भूमीपूजन झाले. या  विमानतळावरून शेतक-यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिले विमान झेप घेईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 5 हजार कोटींची महामार्ग बांधणीची कामे मंजूर झाली आहेत. चंद्रपूर मध्ये पाण्यावर उतरणारी विमानसेवा ही लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले.   

यावेळी श्री. गडकरी म्हणाले की चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासात श्री. मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे वनमंत्री या नात्याने पर्यावरण रक्षणजलसंवर्धन क्षेत्रात काम करत जिल्ह्याचा कायापालट केला आहे. वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी  जागतिक विक्रम केला आहे. विकासाची आस असलेली बल्लारपूरची जनता तळमळीने काम करणाऱ्या श्री. मुनगंटीवार यांना जनता प्रचंड बहुमताने विजयी करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages