राजू खरे यांच्या विजयाबद्दल कुरूल येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष
कुरूल (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा ३० हजारांच्या पुढे मते मिळवून विजय झाल्याबद्दल तालुक्यातील कुरूल येथील महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
कुरूल येथे भीमा साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन जाधव, महाविकास आघाडीचे नेते अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची मुक्तपणे उधळण केली.तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला. हलग्यांच्या कडकडाटात गावातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली.गायकवाड, यावेळी बापूसाहेब जाधव, विनोद आंबरे, रावसाहेब जाधव, गुरुदेव पाटील, योगेश जाधव, अमोल पाटकर, अध्यक्ष नितीन मस्के, इक्बाल शेख, भीमराव माळी, माणिक घोडके, शरद गोरे, धनाजी माळी,हमीद बागवान, चंद्रकांत पाटील, गुंडू पवार, वैभव लांडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments