Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑर्किड स्कुल मध्ये सैनिक छात्रशक्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न

 ऑर्किड स्कुल मध्ये सैनिक छात्रशक्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये सैनिक छात्रशक्ती महाराष्ट्र व नागेश करजगी ऑर्किड स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी सैनिक छात्रशक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात इ.६ व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यामध्ये प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना लाठीकाठी, रायफल, पिस्तूल शूटिंग, आर्चरी, ड्रिल, मार्शल आर्ट, फायर जंप, दांडपट्टा, ढाल तलवार याचे प्रशिक्षण दिले.
        या कार्यक्रमाचा समारोप सोहळा शाळेच्या आवारात संस्थेच्या सचिवा सौ. वर्षाताई विभुते, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, सी. सी. एफ. प्रमुख संकेत कदम, प्राचार्या रुपाली हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संकेत कदम यांनी आपल्या मनोगतात या प्रशिक्षण शिबिराचा फायदा विदयार्थ्यांना भविष्यात कशाप्रकारे होईल हे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर शिबिरातून मिळालेल्या प्रशिक्षणातून आपले कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
               प्राचार्या रुपाली हजारे यांनी मनोगतात सांगितले की सदर प्रशिक्षण शिबिरामुळे मुलांमध्ये  आत्मविश्वास, शिस्त, समायोजन, लवचिकता व सामाजिक कौशल्ये इ. गुणांचा विकास होतो  तसेच या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम बनतील.
अशा नवोपक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अनुजा सुसलादी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments