Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील चित्त थरारक आठवणी सांगताना पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेळके यांना अश्रू अनावर

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील चित्त थरारक आठवणी सांगताना पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेळके यांना अश्रू अनावर



अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगरच्या पाटील विद्यालयात संविधान दिन व राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिनादिवशी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेळके यांचे अनुभव कथन  भारतीय संविधान दिना दिवशीच २६/११/२००८ रोजी मुंबईवर पाकिस्तानी लष्करी तोयबाच्या 10 अतिरेक्यांनी हल्ला केला त्याला चोख प्रतिउत्तर देत असताना हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामठे कॅप्टन संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबाळे, राहुल शिंदे अशा अनेक अधिकाऱ्यांना वीर मरण आले. मुंबई अतिरेकी हल्ल्यात आझाद मैदान पोलीस ठाण्यामधून माझ्या साथीधारासह अजमल कसाब व इस्माईल यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर आमच्यावर हल्ला केला आम्ही सावध असल्याने गाडीतच वाकलो त्यामुळे आम्ही बचावलो. त्यांना जशास तसे उत्तर दिले पुढे त्यांना पकडण्यात यश आले मात्र यात जे पोलीस अधिकारी व कर्मचारी गमावले  विजय साळसकर, शिंदे यांच्यासह दहा अधिकारी व कर्मचारी यांचा पोलिस पंचनामा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली हे सांगतांना निवृत्त  पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेळके यांचे अश्रू अनावर आले. कै. शंकरराव बाजीराव  पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन व दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी अंजनगाव खे येथील मुंबई दहशतवादी हल्ल्यात सेवा बजावणारे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेळके हे अनगर येथे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले होते.  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी भारतीय संविधानाची रचना व त्यातील कलमे हक्क कर्तव्य व अधिकार यावर आधारित विस्तृत मार्गदर्शन केले तर हर घर संविधान या विषयावर पर्यवेक्षक माधव खरात यांनी आपले विचार व्यक्त केले. सविधान दिनानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले. संविधान दिनानिमित्त सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून संविधान दिन साजरा केला. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी संविधान पुस्तकाचे वारंवार वाचन करण्याविषयी व प्रत्येक घरात संविधान पुस्तक उपलब्ध करून घेण्याविषयी विद्यार्थ्यांना सूचित केले. आदर्श नागरिक घडवण्यासाठी संविधानाचे ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी विशद केले यावेळी भारतीय संविधानावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी राजेंद्र डोके, परमेश्वर थिटे,संजय निलकंठ,सत्यवान कांबळे, उज्वला घोलप,अनुराधा गोडसे,माधवी पाचपुंड,दाजी गुंड,कुबेर सरक,सोमनाथ गुंड, विलास गुंडआदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सत्यवान दाढे यांनी केले तर दाजी गुंड यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments