शहर उत्तर' मध्ये शोभा बनशेट्टी यांची बंडखोरीने
भाजपचा सुपडासाफ होणार..?
या मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी 'भाजपा'चे विजयकुमार देशमुख, 'राष्ट्रवादी'चे महेश कोठे आणि 'अपक्ष' शोभा बनशेट्टी असा तिरंगी सामना रंगणार आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या तथा माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी खरंच मनावर घेवून ही निवडणूक लढविली तर विजयकुमार देशमुख यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. शिंदे गटाला २५ नगरसेवक; बनशेट्टींचे ठाम आणि श्रेष्ठींचा नाईलाज शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मताची विभागणी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला किमान २५ जागा देण्यासंदर्भा 'भाजपा'कडून आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे शिंदे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना माघार घेण्यास्तव कसोशीने प्रयत्न करण्यात आले. मात्र आपण रिंगणात राहणारच असे ठाम मत त्यांनी व्यक्त केल्याने 'भाजपा' श्रेष्ठींचा नाईलाज झाल्याची चर्चा रंगली आहे. २६ पैकी ६ उमेदवारांची माघार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमाले शिंदे यांनी स्वराज्य पक्षाकडून या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज माघार घेतले. तसेच 'काँग्रेस'चे सुनील रसाळे, प्रकाश वाले, हिंदू महासभेचे संजय साळुंखे आणि अपक्ष अमरनाथ बिराजदार यांनीही माघार घेतली. या मतदार संघातून एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतल्याने २० उमेदवार रिंगणात आहेत.
0 Comments