Hot Posts

6/recent/ticker-posts

डोणजमध्ये उद्या अंबीर मुलाणी स्मृती करंडक किशोर गट खो-खो स्पर्धा

 डोणजमध्ये उद्या अंबीर मुलाणी स्मृती करंडक किशोर गट खो-खो स्पर्धा


सोलापूर(कटूसत्य वृत्त) :- डोणज (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर अंबीर मुलाणी स्मृती करंडक 14 वर्षांखालील गटाची जिल्हा किशोर खो-खेो स्पर्धा रविवारी 3 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशच्या मान्यतेने  डोणज येथील ए. एम. स्पोर्टस्‌‍ क्लबच्या वतीने वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील प्रथम चार संघास 10, 7, 5 व 3 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू, आक्रमक व संरक्षक यासाठी प्रत्येकी 1 हजार रुपयांचे पारितोषिक आहे. 3 नोव्हेंबर 2024 रोजी भाग घेणारा खेळाडू 14 वर्षांखालील असावा. स्पर्धेच्या वेळी भाग घेणाऱ्या संघानी जन्मतारखेचा दाखला व आधार कार्ड दाखल करणे बंधनकारक आहे. इच्छुक संघानी आमसिद्ध कोळी (7796873349), सागर बगले (7083345355) रोहित लिगाडे (9503705855) अथवा अजित कोळी (8767232574) यांच्याशी संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments