प्रेस नोट
वडगाव शेरीच्या संपूर्ण विकासासाठी 'बसपा'ला कौल द्या-डॉ.हुलगेश चलवादी
'पहिले रिपोर्ट,नंतर वोट' अभियानाला सुरूवात
विकास आणि समृद्धीची 'भैय्यांची गॅरंटी'
सरकारने गेल्या काळात किती नवीन महाविद्यालये उभारली ? किती प्राध्यापकांची नियुक्ती केली? किती नवीन शाळा उभारल्या? किती शिक्षकांची भरती केली? या सर्व प्रश्नांची उत्तर सत्ताधार्यांकडे नाहीत. वडगाव शेरी परिसरात हत्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिक त्यामुळे हतबल झाले आहेत. अशात सामाजिक सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या याचे उत्तर सरकारकडे आणि लोकप्रतिनिधींकडे नाहीत.मतदारांनी त्यामुळे यंदा मत मागण्यासाठी येणाऱ्यांना अगोदर त्यांचे 'रिपोर्ट कार्ड'मागावे आणि मतदार संघातील सर्व समस्या डोळ्यासमोर ठेवून मतदान करण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.
गोरगरिबांच्या मुलांना हेतुपुरस्सर शिक्षणांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार संघाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. परिसरात सुविधांची वानवा आहे. सर्वसामान्यांच्या घशाल्या त्यामुळे कोरड पडते आहे. आता या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी योग्य नेत्याच्या हाती नेतृत्व देण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची आहे. गेल्या दीड दशकामध्ये विकासकामांना बगल देण्यात आली आहे. पंरतु, यंदा लोकप्रतिनिधींनी मतदार संघाच्या विकासाचा ठेवलेला 'बॅकलॉक' भरून काढण्याचा निर्धार बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पक्षाचा कॅडर घरोघरी जावून मतदारांना जागरूक करण्यासाठी 'पहिले रिपोर्ट, नंतर वोट' हे अभियान राबवत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
'विकसित वडगाव शेरी, समृद्ध वडगाव शेरी' या संकल्पनेवर मार्गक्रमण करीत १०० टक्के विकासकारण हाच आम्हचा उद्देश असून सर्वसामान्यांसह शोषित,पीडित आणि उपेक्षितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' या तत्वाचा अवलंब करीत मतदार संघाच्या विकासाचे नवे 'मॉडल' मतदारांच्या पाठबळाने महाराष्ट्राला दाखवून देवू, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला
0 Comments