Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयकुमार देशमुख यांच्या षडयंत्र्याला कंटाळून सुरेश पाटील यांनी अपक्ष फॉर्म घेतला

 विजयकुमार देशमुख यांच्या षडयंत्र्याला कंटाळून सुरेश पाटील यांनी अपक्ष फॉर्म घेतला 


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 248 शहर उत्तर विधानसभा मतदार संघात आजवर ऐकून 33 जणांनी उमेदवारी अर्ज घेतला असून विजयकुमार देशमुखच्या विरोधात भाजपाच्याच सुरेश पाटील यांनी अपक्ष फॉर्म घेतल्याने आज दिवसभर राजकीय क्षेत्रात मालक आणि आण्णा यांची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. गेल्या 4 टर्म मध्ये विजयकुमार देशमुख हे निवडून आले असले तरी 2019 मध्ये माजी सभागृह नेते यांनी लाखोंच्या संख्येने पदयात्रा काढत शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरले होते.

परंतु भाजप पक्षाच्या मनधरणी वरून पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत विजयकुमार देशमुख यांना बालेकिल्ल्यातून लाखो मताने निवडून दिले. त्यानंतर पाटील यांच्यावर नगरसेवक तिकीट देण्यापासून ते राजकीय क्षेत्रात विरोध दर्शवण्यासाठी विविध शडयंत्र रबवण्यात आले. त्यानंतर त्याच्यांवर अज्ञातांकडून विषप्रयोग ही झाल्याने नंतरच्या काळात कोणतेही पद न देता पक्षात जाणून भुजून विरोध करण्यास सुरुवात झाले

         विजयकुमार देशमुख यांच्या षडयंत्र्याला कंटाळून 15 दिवसाखाली सर्व विरोधकांनी देव पाण्यात ठेवून पक्षश्रेष्ठकडे तक्रार ही दाखल केले. मुंबईत गेलेल्या 8 जणांपैकी कोणालाही तिकीट दया आम्ही जोमाने काम करू पण देशमुखाना तिकीट देऊ नका अन्यथा अपक्ष म्हणून थांबून पाडू असा इशारा पण देण्यात आला होता. परंतु शेवटी विजयकुमार देशमुखाना तिकीट मिळाल्याने आज बुधवार रोजी सुरेश पाटील यांनी निवडणूक कार्यालयातून PA च्या हस्ते अपक्ष फॉर्म घेतले असून मालकशाही विरोधात आण्णा फॉर्म घेतले का असा सवाल जनतेच्या वतीने विचारला जात आहे.

जाता जाता
       जुन्या कार्यकर्त्यांना जवळ करा नाराजी दूर करा म्हणून पक्षांकडून आदेश आल्याने गेल्या 8 दिवसांपासून सुरेश पाटील यांच्याकडे भाजपाचे पदाधिकारी भेट घेत आहेत परंतु पाटील सापडत नसल्याने पदरात निराशाच मिळत असल्याने राजकीय क्षेत्रात मात्र चर्चेला उधाण आला आहे.

         शहर उत्तर विधानसभा मतदार संघात महेश कोठे हे तुतारी पक्षातून निवडणूक लढावणार असून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झाला नाही. तसेच लिंगायत समाजाचे माजी महापौर शोभा ताई बनशेट्टी यांनीही उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. घोंगडे वस्तीतील सदा ईश्वर बंगल्यात दररोज विविध फिल्डिंग लावत असल्याने शहर उत्तर विधानसभा मतदार संघात यंदाच्या वेळी मतदान चुराशीने आणि अटीतटीची होण्याची शक्यता नाकारता येत नसाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

सुरेश पाटील यांचे जवळीक असलेले महेश कोठे यांना पाटील पाठिंबा देत मालकांना पाडणार? नसेल तर बनशेट्टी यांना पाठिंबा देऊन बालेकिल्ला भाजपमुक्त करणार किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी भरणार हे पाहणे आता गरजेचे आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments