मनोहर सपाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवारी द्यावी- महादेव गवळी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माजी अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मुलाकात ही दिलेले आहे. तथापि सपाटे हे गेल्या 45 वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी यापूर्वी विधानसभेच्या दोन निवडणुका शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवलेले आहेत. त्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा मोठा अनुभव आहे.
मराठा समाज सेवा मंडळ आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही शिक्षण संस्थेचे गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करीत आहेत. शरद नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक जाळेही विणले आहेत. माझी महापौर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता पक्षाने त्यांना यंदाचा विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना संधी देण्यात यावी. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. सपाटे हे मराठा समाजाचे असून समाजाच्या दोन्ही शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. याचाही पक्षाने जरूर विचार करून सपाटे यांच्या नावे उमेदवारी द्यावी. अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे आम्ही गवळी वस्ती तालीम संघाचे प्रमुख महादेव गवळी यांनी केले आहे.
0 Comments