संतोष पवार यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार संतोष पवार यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संतोष पवार यांना ए.बी. फॉर्म दिला आहे. संतोष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता संतोष पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला जवळ केले आहे.
दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडीकडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते A B फॉर्म देण्यात आला आहे.यावेळी यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments