रिपाई राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

लऊळ (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील अरण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लोकनेते बापुसाहेब (बाॅस) जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे गरजू व होतकरू मुलांना मोफत शालेय वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर अरण येथील भिमनगर मध्ये बापुसाहेब जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी रिपाईचे माढा तालुका कोषाध्यक्ष युवा नेते माऊली ताकतोडे अरण गावच्या तिसऱ्या आघाडिचे सर्वेसर्वा हनुमंत शिंदे,रिपाई जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील ओहोळ,तालुका युवक उपाध्यक्ष ओंकार ताकतोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पाटिल,शिवाजी गायकवाड,बंडू भोसले, बाळासाहेब लांडगे,नवनाथ जानराव,युवा उद्योजक तुकाराम ताकतोडे,सचिन वडणे ,आण्णा ताकतोडे, दिपक शितोळे, माऊली जाधव,बंडु भवर, संतोष जानराव तुकाराम ताकतोडे,नितीन सोलंकर आबासाहेब खंडागळे,संजय झाडे अक्षय लोखंडे,तुषारबंटी थोरात याबरोबरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली ताकतोडे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments