Hot Posts

6/recent/ticker-posts

समता पतसंस्थेचा अनेक व्यवसायिकांना मदतीचा हात- माजी आ.अँड रामहरी रुपनवर

 समता पतसंस्थेचा अनेक व्यवसायिकांना मदतीचा हात- माजी आ.अँड रामहरी रुपनवर


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- गत २५ वर्षात खडतर प्रवास करीत, आता पतसंस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून समता पतसंस्थेने अनेक व्यावसायिकांना मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार अँड. रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. नातेपुते येथील विकासरत्न विकास सोसायटी व समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. रामहरी रुपनवर म्हणाले, पतसंस्थाना ठेवी घ्याव्याच लागतात व कर्ज द्यावीच लागतात. ठेवीदार कसापण चालतो मात्र कर्जदार चांगलाच असावा लागतो. संस्थेचे अर्थकारण चक्र फिरले पाहिजे. पतसंस्थेने आपली गरज भागविली हे लक्षात घेऊन कर्जाची वेळेवर परतफेड करा. संस्थापक चेअरमन अॅड. भानुदास राऊत म्हणाले, १९९९ सालात दसऱ्या दिवशी पतसंस्थेची स्थापना केली अडचणीवर मात करत पंचवीस वर्षे पूर्ण केले. लवकरच २५ वा वर्धापन दिन साजरा होणार असून वर्धापन दिनानिमित्त पन्नास लाखाचे कर्ज वाटप संस्था करणार आहे. विकासरत्न सोसायटीस वीस वर्षे झाली असून या संस्थेचे शंभर टक्के कर्ज वसुली असते. बी.जे. कोळसे-पाटील वाचनालयास बावीस वर्ष झाली असून समता स्कूल व्यवस्थित सुरु आहे.
यावेळी समता परिवाराचे सर्वेसर्वा अॅड. भानुदास राऊत, विजय उराडे, नगरसेवक दादासाहेब उराडे, अॅड. रावसाहेब पांढरे, तसेच प्रवीण काळे, रामभाऊ बोराटे, सुधाकर राऊत, आजेश पांढरे, सावता बोराटे, सत्यजित बरडकर, अॅड. पांडुरंग लांडे, उत्तम बरडकर, अॅड. संतोष पांढरे, धनंजय रासनकर, अर्जुन पिसाळ, बिटू काळे, दत्तात्रय हुलगे, सुनील बोराटे, गणेश कुचेकर, अनिल काळे, सदाशिव ननवरे, भगवान बोराटे, अंबादास बरडकर, भागवत कचें, बापू पांढरे, रवि ननवरे, अमित भिंगारदिवे, महेश ननवरे, संतोष बरडकर, मधुकर बरडकर, संतोष राऊत, रणजीत जठार, दत्तात्रय सूर्यवंशी, कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments