Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी शहरात दोन लाख 63 हजार रुपयांचा गांजा पकडला

 टेंभुर्णी शहरात दोन लाख 63 हजार रुपयांचा गांजा पकडला


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहरात खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या वरती टेंभुर्णी पोलीस स्टेशन व करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून गांजा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४२ वा.करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी शहरात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना मिळाली होती.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या आदेशाने व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
 पोसई हनुमंत वाघमारे यांच्या पथकाने टेंभुर्णी (ता.माढा) येथील सिध्दार्थनगर मधील (घर नंबर -११४५) येथील सुरज बबन लोंढे (वय-३४ वर्ष) याच्या घरी धाड टाकली असता लोंढे याच्या राहत्या घरात पोलिसांना हिरवट व काळपट रंगाचा उग्र वासाचा गुंगी आणणारा मादक पदार्थ १३ किलो गांजा मिळून आला.पोलिसांनी तो गांजा रीतसर जप्त केला आहे.त्याची वीस हजार रुपये कि.ग्रॅ.प्रमाणे २ लाख ६० हजार रूपये किमंत होत आहे.तसेच गांजा बरोबर वजनकाटा,प्लास्टिक पिशव्या असे इतर तीन हजार रुपये किमतीचे साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे.टेंभुर्णी शहरात पोलिसांनी धाड टाकून गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे टेंभुर्णी परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे दहाबे दणाणले असून दिवाळीच्या तोंडावर टाकल्याने अवैध धंदेवाल्याने या दाढीचा दसका घेतला आहे
हि कारवाई करण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पीएसआय अजित मोरे, विलास रणदिवे, पोलीस पवार, पोलीस भोसले, पोलीस गुडाळ, महिला पोलिस इंगोले, पोलीस गिरमकर, पोलीस लांडगे, पोलीस साठे, पोलीस पर्वते, पोलीस अनभूले, यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई केली असून या बाबत पोसई हनुमंत झुंबर वाघमारे (वय-३४) यांच्या फिर्यादीवरून ए पीआय गिरीष जोग यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments