शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयाला नॅक कडून बी++ श्रेणी
अकलूज(कटूसत्य वृत्त):- येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या बीबीए अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाला बेंगळुरू राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदाची (नॅक) कडून नुकतेच ब+ श्रेणी प्रदान करण्यात आले. २९ व ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदाची (नॅक पीअर टीम) तज्ञ समीतीने भेट देऊन महाविद्यालयातील विविध पैलूंची तपासणी करून बेंगळुरू येथील नॅक कार्यालयाला अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार महाविद्यालयाला ब++ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. बेंगळूरच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद या संस्थेने नियुक्ती केलेल्या तज्ञ समितीत दिल्ली येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स,दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अजयकुमार सिंग, चंडीगड येथील चंडीगड विद्यापिठाचे संचालक डॉ. निलेश अरोरा व तिरपुत्तूर (तमिळनाडू) येथील स्कॅर्ड हार्ट या अटाॅनाॅमस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मारिया ॲटोनी राज यांची काम पाहिले. सदर समितीने महाविद्यालय परिसरातील ग्रंथालय, वसतीगृह, जिमखाना, प्रशासकीय कार्यालय, प्रसाधनगृह, खेळाचे मैदान, संगणक कक्ष या भौतिक सुविधांसह शैक्षणिक व शिक्षकेतर उपक्रम आदी बाबींची पडताळणी व तपासणी केली होती. तसेच सदर समिती संस्थेचे प्रमुख खासदार धैर्यशील मोहिते पाटील , अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील, सचिव धर्मराज दगडे, प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, यांच्या सह महाविद्यालयाचे विकास समितीच्या सदस्यांबरोबर बैठक आयोजित करून महाविद्यालयाच्या गेल्या पाच वर्षांतील वाटचालीचा आढावा घेण्यात आला होता. सदर समितीने महाविद्यालाच्या माजी विद्यार्थी, पालक व सध्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. सदर मूल्यांकनासाठी महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे पालक संचालक डॉ. विश्वनाथ आवड, अरूण एकतपुरे, सौ. शहजादी काझी, संस्थेचे प्रशासनाधिकारी अश्रफ शेख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक प्रा. भरत साठे शिवरत्न शिक्षण संस्थेचे सर्व संचालक सर्व शाखांचे प्रमुख व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील बीबीए महाविद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, संस्थेचे अध्यक्षा शितलदेवी मोहिते -पाटील, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments