Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर मतदारसंघातून वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल..महाविकास आघाडीकडूनच आपली उमेदवारी असल्याचा दावा..

 पंढरपूर मतदारसंघातून वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

महाविकास  आघाडीकडूनच आपली उमेदवारी असल्याचा दावा..

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असून, माझ्या उमेदवारीची शिफारस करणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील   नेतेमंडळींचेही आभार , अशी प्रतिक्रिया वसंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून

महाविकास आघाडीचे, पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून वसंतराव देशमुख यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, महाविकास आघाडीकडून आपणच उमेदवार असणार याची ग्वाही दिली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच चालली होती. मा.आ. प्रशांत परिचारक, अनिल सावंत,भगीरथ भालके ,नागेश भोसले आदी मंडळींनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. परंतु अचानक वसंतराव देशमुख यांनी शुक्रवारी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार यांच्या आदेशानुसारच आपण उमेदवारी अर्ज भरला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नेत्यांसह विजयसिंह मोहिते-पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या नावाची शिफारस , राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याकडे केली होती. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी आदेश दिल्याप्रमाणे, आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझ्या उमेदवारीसाठी झटलेल्या महाविकास आघाडीतील नेतेमंडळींचेही आपण आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व सामान्य नागरिकांकडून देशमुख कुटुंबावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे यावेळी येथील मतदार आपणास आशीर्वाद देईल, असे विचार यावेळी वसंतराव देशमुख यांनी बोलून दाखवले.

Reactions

Post a Comment

0 Comments