"सोनी महाविद्यालयात प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण संपन्न"
सोलापूर (कटूसत्यवृत्त):- दि. ७-१०-२०२४ ते ११-१०- २०२४ रोजी सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात बी.सी.ए. व बी.एस्सी. सी इ.सी.एस. तृतिय वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी ६ दिवसीय प्लेसमेंट पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण देण्याकरीता पुणे येथील संस्थेचे कॉर्पोरेट ट्रेनर संतोष सांगवे यांची उपस्थिती होती. सदर प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळविण्याकरीता आवश्यक वैयक्तिक गुणांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणात खालील विषयावर विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभागासह प्रशिक्षणाचे पूष्पगुंफन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचे स्वतःचे असे वेगळे कौशल्य असते याची जाणिव करुन देत ते इतरापेंक्षा नक्कीच वेगळा असतो व तो अद्वितीय असतो. त्यानी सुरुवात नोकरीच्या संधी शोधत असताना कशाप्रकारे त्याची देहबोली असली पाहिजे व व्यावसायिक सौंदर्य काय असते? करिअरसाठी इंग्रजी भाषेचे महत्व बोलण्याची कला कशी आत्मसात केली पाहिजे, अस्तित्वात असलेल्या नोकरीच्या संधी, मुलाखतीची तथापी व्यावसायिक संप्रेषण / संभाषण गट चर्चेला चालना देणे व्यावसायिक नैतिकता निर्णायक धीरगंभीर विचार करणे, प्रकल्पांचे सादरीकरण, गट सादरीकरण, गट चर्चा, डिजीटल ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया, बोलण्याची कला व त्याचे मुल्यांकन करण्याची कला आत्मसात करणे. समस्यांची सोडवणूक व आर्थिक बाबींचे व्यवस्थापन या आणि तत्सम कौशल्याचा उहापोह सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. शेवटी विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तरांच्या सत्रात शंकाचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांतजी सोमाणी, सेक्रेटरी मधुसुदनजी करवा, संस्थेच्या सदस्या सौ. उमाजी बलदवा, सौ. काननजी मिणीयार व संस्थेच्या डायरेक्टर डॉ. वासंती अय्यर प्राचार्या डॉ. आशा रोकडे आणि उपप्राचार्या प्रा. हरदिप बोमरा, ट्रेनिंग प्लेसमेंटच्या प्रमुख सौ महाजन मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 Comments