शरद पवारांचा अहिल्यानगर जिल्ह्यात मास्टरस्ट्रोक ! 'या' विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी
मुंबई (कटूसत्य वृत्त):-महायुती मधील तिन्ही घटक पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी कडूनही आता आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होऊ लागली आहेत.
या यादीत शरद पवारांनी 11 नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून अहिल्या नगर जिल्ह्यातही दोन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतं आहेत. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक फारच काटेदार होईल अशी शक्यता आहे. शरद पवार गटाने काल आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय, यामध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे.
या 45 उमेदवारांच्या यादीत तब्बल 11 नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे हे विशेष. दरम्यान, आता आपण शरद पवार गटाने कोणा कोणाला उमेदवारी दिलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्हा सहित संपूर्ण राज्यात कोणत्या नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळाली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या 11 नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
शरद पवार गटाने आपल्या यादीतून 11 नवीन उमेदवारांची लॉन्चिंग केलेली दिसते. या यादीत युगेंद्र पवारांचे नाव देखील पाहायला मिळाले असून या निमित्ताने पवार कुटुंबियांच्या आणखी एका युवा नेत्याची सक्रिय राजकारणात लॉन्चिंग करण्यात आली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात देखील दोन नवीन चेहऱ्यांची नावे पाहायला मिळतायेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरे तर राणी लंके यांनाच उमेदवारी मिळणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट झाले होते. यानुसार काल राणी लंके यांना अधिकृतरित्या उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधून संदीप वर्पे यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. संदीप वर्पे हे महायुतीच्या आशुतोष काळे यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. कोल्हे यांना थांबवण्यात भाजपाला यश मिळाल्यानंतर संदीप वर्पे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे.
यासोबतच, जामनेरमधून दिलीप खोडपे, मूर्तीजापूरमधून सम्राट डोंगरदिवे, अहेरीमधून भाग्यश्री आत्राम, मुरबाडमधून सुभाष पवार, युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेतून तरआष्टीमधून मेहबूब शेख, चिपळूनमधून प्रशांत यादव, तासगाव – कवठेमहांकाळमधून रोहित पाटील, हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप या 11 नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र या सर्वच्या सर्व 11 नव्या चेहऱ्यांसमोर तगडे उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे येथील निवडणुकी फारच काटेदार होण्याची शक्यता आहे. आता आपण शरद पवार गटाने उमेदवारी दिलेल्या 45 जणांची नावे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
अहिल्या नगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी
कोपरगाव मधून संदीप वर्पे आणि पारनेर मधून राणी लंके या दोन नव्या उमेदवारांसोबतच काही जुन्या चेहऱ्यांना देखील जिल्ह्यात पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. राहुरी मधून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेड मधून विद्यमान आमदार रोहित पवार, शेवगाव विधानसभा मतदारसंघातून प्रताप ढाकणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे शरद पवार गटाने जाहीर केलेली आहे.
शरद पवार गटाने उमेदवारी दिलेले 45 उमेदवार
0 Comments