मोहोळ मतदार संघातील जनता पुन्हा सेवा करण्याची संधी देणार - आ.यशवंत माने
आ. यशवंत मानेंनी भरला उमेदवारी अर्ज
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ राखीव विधानसभा जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुनश्च दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
अजितनिष्ठ मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मात्र अजित पवार यांच्यावरील निष्ठा राखली आहे. त्यामुळे या पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली आहे. मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील- अनगरकर यांचे भक्कम पाठबळ हेच आमदार यशवंत माने यांचे प्रमुख भांडवल मानले जाते.
मोहोळ येथे २४७ मोहोळ(अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. यशवंत माने यांनी पक्षाच्या वतीने अधिकृत फॉर्म सादर केला आहे.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्यांचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव पाटील,माजी सभापती हनुमंत माने गुरुजी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सज्जनराव पाटील,सोलापूर मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश चौरेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनिल भोसले उपस्थित होते.
0 Comments