Hot Posts

6/recent/ticker-posts

26 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना भिडणार

 

26 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना भिडणार



मुंबई (कटूसत्य वृत्त):- : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक पक्षाकडून याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना घटक पक्षाकडून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

तर महाविका आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. दोन्ही पक्षांची यादी पाहिल्यास राज्यात 26 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार असल्याचे पाहायला मिळत आहे. (Shiv Sena will fight against Shiv Sena in 26 places in Maharashtra)

ठाकरे आणि शिंदे गटाची मुंबई आणि उपनगरातील पहिली यादी पाहिल्यास ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिंदे गटाकडून स्वत: एकनाथ शिंदे उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गुरु असलेले आनंद दिघे यांचे पुतणे केदार शिंदे निवडणूक लढणार आहेत. यानंतर मागाठणेमध्ये ठाकरे गटाकडून अनंत (बाळा) नर आणि शिंदे गटाकडून मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुर्ला मतदारसंघात ठाकरे गटाकडून प्रविणा मोरजकर आणि शिंदे गटाकडून मंगेश कुडाळकर यांच्यात लढत होत आहे. तर माहिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे महेश सावंत यांना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आव्हान देताना दिसणार आहेत.

कोकणात दोन्ही गटाची यादी पाहिल्यास रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सुरेंद्रनाथ (बाळ) माने आणि शिंदे गटाकडून उदय सामंत यांना संधी देण्यात आली आहे. कुडाळ मतदारसंघात ठाकरे गटाकडून वैभव नाईक आणि शिंदे गटाकडून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. सावतंवाडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन तेली आणि शिंदे गटाकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात लढत होणार आहे. राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन साळवी यांना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे आव्हान असणार आहे. दापोली मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय कदम आणि शिंदे गटाकडून योगेश कदम यांच्यात लढत होणार आहे. तर महाड मतदारसंघात ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप विरोधात शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, पाटण मतदारसंघात ठाकरे गटाकडून हर्षद कदम आणि शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, सांगोला मतदारसंघातून दीपक आबा साळुंखे आणि शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील, परांडा मतदारसंघात राहुल ज्ञानेश्वर पाटील आणि शिंदे गटाकडून तानाजी सावंत, कर्जत मतदारसंघात नितीन सावंत आणि शिंदे गटाकडून महेंद्र थोरवे, मालेगाव बाह्य मतदारसंघात अद्वय हिरे आणि शिंदे गटाकडून दादा भुसे, नांदगाव मतदारसंघात गणेश धात्रक आणि शिंदे गटाकडून सुहास कांदे, वैजापूर मतदारसंघात दिनेश परदेशी आणि शिंदे गटाकडून रणेश बोरणारे, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे आणि शिंदे गटाकडून संजय शिरसाठ, संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी आणि शिंदे गटाकडून प्रदीप जैस्वाल, सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकर आणि शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार, कळमनुरी मतदारसंघात ठाकरे गटाकडून डॉ. संतोष टाळफे आणि सिंदे गटाकडून संतोष बांगर, रामटेक मतदारसंघातून विशाल बरबटे आणि शिंदे गटाकडून आशिष जैस्वाल, मेहकर मतदारसंघातून ठाकरे गटेकडून सिद्धार्थ खरात आणि शिंदे गटाकडून संजय पायमुलकर, पाचोरा मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी आणि शिंदे गटाकडून किशोर धनसिंग पाटील, ओवळा माजिवडा मतदारसंघातून नरेश मणेरा आणि शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक, राधानगरी मतदारसंघात ठाकरे गटाकडून के. पी. पाटील आणि शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर यांच्यात लढत होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments