सोलापूर शहर मध्य मधून सोलापूर विचार मंचच्या
डॉ. संदीप आडके यांचा अर्ज दाखल-
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आज सोलापूर शहर मध्य मधून सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप शंकरराव आडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोलापूर विचार मंचचे सभासद उपस्थित होते.
सोलापुरातील अनधिकृत चिमणीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर सोलापूर होटगी रोड विमानतळ सुरू करण्यामध्ये सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून डॉ. संदीप आडके यांनी मोठी संघटना उभा करून गेले साडेचार वर्षांमध्ये सोलापूरच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने सोलापुरातील सर्व स्तरातील व विशेषतः सुशिक्षित लोकांकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. आपले अत्यंत व्यस्त वैद्यकीय क्षेत्रातील कामकाज सांभाळत त्यांनी गेले साडेचार वर्ष सोलापूरच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आज सुद्धा सातत्याने सर्व विमान कंपन्यांबरोबर समन्वय राखून येत्या दोन आठवड्यामध्ये सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याचे त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत .
सोलापुरातील अनेक समस्यांमुळे व विमानसेवा नसल्यामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये सोलापूरचे प्रगती खुंटली होती. येथून कोणत्याही स्तरावर उद्योगधंदे वाढीसाठी व सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळे सोलापुरातील इतर अनेक ज्वलंत समस्या मार्गी लावण्यासाठी सोलापूरचे सक्षम व अत्यंत सुशिक्षित प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. संदीप आडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली ३५ वर्ष गाजत असलेला जुनी मेमील जागेचा घोटाळा डॉ. आडके यांच्या पुढाकाराने सोडवला जात आहे. शहरातील उड्डाणपूल, रेल्वे , परिवहन,स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, बायोमेडिकल वेस्ट घोटाळा,माळढोक संवर्धन अशा अनेक गोष्टींमध्ये डॉ. संदीप आडके यांनी सोलापूर विकास मंचच्याद्वारे सोलापुरात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांना सोलापूरच्या प्रगतीसाठी तमाम सोलापूरकर नक्कीच पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments