Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांचा हैदराबाद अभ्यास दौरा

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांचा हैदराबाद अभ्यास दौरा 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा हैदराबाद येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलेट रिसर्च, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ राईस रिसर्च, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॉइलसीड रीसर्च, सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट ऑफ ड्रायलँड अग्रीकल्चर नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅंट जेनेटिक रिसर्च, इंडियन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिटयूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक्स आदी राष्ट्रीय संशोधन संस्थांना भेट दिली. इंडियन इन्स्टिटयूट ऑइलसीड रिसर्च येथे डॉ. मंगेश दुधे (शास्त्रज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना विविध तेलबियांविषयी (सुर्यफुल, जवस, एरंड, करडई) व त्यांमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगितली. इंडियन इंस्टिट्यूट अॉफ अॉइलसीड रिसर्च येथे विद्यार्थ्यांनी कृषीजैवतंत्रज्ञान विभाग, वनस्पती ऊती संवर्धन विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आदी विभागांना भेट देऊन तेथील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यासोबतच 'न्युट्रीहब' नावाच्या व्यवसाय विकास सेवा प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. इंडियन इंन्स्टिटय़ूट 

अॉफ राईस रिसर्च व सेंट्रल रिसर्च इंन्स्टिटयूट ऑफ ड्रायलँड अग्रीकल्चर येथील शास्त्रज्ञांसोबत संवाद साधून बायोफोर्टिफिकेशन, मॉलिक्युलर मार्कर टेकनॉलॉजि, ट्रान्सजेनेसिस यांसारख्या विविध पद्धतींचा वापर करून पिकांच्या जाती कशा निर्माण केल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बिर्ला मंदिर, एन. टी. आर गार्डन, हुसेनसागर, गोवळकोंडा किल्ला, चारमिनार आदी पर्यटनस्थळांना भेट दिली. या सहलीसाठी प्रा. सागर महाजन व प्रा. सायली बडेकर यांचा सहभाग होता. या सहलीसाठी प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments