हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरकर जनतेच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी हर्षवर्धन पाटील यांचे त्यांच्या घरी त्यांचे ओैक्षण करून आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यानंतर आयोजित सभेत उपस्थितांशी संवाद साधला. इंदापूर मतदारसंघातील मायबाप जनता 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून हर्षवर्धनभाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करुन विधानसभेत पाठवतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी महाविकास आघाडीत पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 Comments