इंडियन मॉडेल स्कूल (सी.बी.एस. ई.) च्या मानस गायकवाड ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 25, 2024

इंडियन मॉडेल स्कूल (सी.बी.एस. ई.) च्या मानस गायकवाड ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 इंडियन मॉडेल स्कूल (सी.बी.एस. ई.) च्या मानस गायकवाड ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा  बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड येथे संपन्न झाल्या. 

या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात मानस सुमुख गायकवाड याने उत्कृष्ट खेळ करत सहा पैकी साडे चार गुण मिळवित तिसरा क्रमांक प्राप्त करून आपले महाराष्ट्र संघातील स्थान निश्चित केले.त्याच्या राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेश येथे होणार आहेत. त्याला क्रीडा शिक्षक सचिन ढवाण, राजकुमार  माने व प्रशिक्षक उदय वगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

 या उल्लेखनीय  यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष  ए. डी. जोशी सर, सचिव अमोल जोशी सर,  साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सौ. सायली जोशी मॅडम, मुख्याध्यापिका सौ. अपर्णा कुलकर्णी मॅडम, सौ. अचला राचर्ला मॅडम, सौ.ममता बसवंती मॅडम यांनी कौतुक करत अभिंनदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages