दक्षिणची जागा काँग्रेसलाच सुटणार, मानेच लढणार, शिंदेंचा निरोप, कार्यकर्त्यांचा जल्लोष
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापुरात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना निरोप आला आहे. सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसलाच राहणार आणि दिलीप माने यांनांच जागा सुटणार असे आश्वासन प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. दिल्लीतील बैठकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना फोन आला आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्या बंगल्याबाहेर हजारो कार्यकर्ते एकवटले होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी मला कल्पना दिली आहे की सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसला सुटणार आहे. जर ही जागा मला मिळाली नाही तर मी एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याचे माने म्हणाले. सोलापूर दक्षिण मधून काँग्रेसचे दिलीप माने यांना उमेदवारी न देता ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
आता ठाकरे गट काय भूमिका घेणार?
दरम्यान काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकामुळे आता ठाकरे गट काय करणार? हे पाहमं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना एबी फॉर्म देखील दिला आहे. आता अमर पाटील काय नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोलापूर दक्षिणमधून ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत माने यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज या सर्व प्रकारावर दिलीप माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा माझा अपमान नसून माझे नेते सुशिलकुमार शिंदेचा अपमान असल्याचे माने म्हणाले. त्यामुळं आम्ही फॉर्म भरणार, केवळ दक्षिण सोलापुरातच नाही तर आणखी कुठंकुठं भरतो ते पाहा अशा इशारा माने यांनी दिली आहे. अपक्ष लढायचं की कसं ते आम्ही ठरवू. माझं नुकसान होऊन होऊन काय होईल, आता बघूच असा इशाराही दिलीप माने यांनी दिला आहे. वाघ म्हातारा झालाय म्हणून काय होतं. वाघ वाघ असतो असेही माने म्हणाले. ही निवडणूक आरपारची निवडणूक असेल, जनता जे ठरवेल तोच आमचा निर्णय असेल असंही माने म्हणाले.
0 Comments